तुमच्या मुलांचा इंग्रजी शब्दकोश वाढवण्यासाठीचे 4 सोपे उपाय
आजकाल आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणासाठी सामान्यतः इंग्रजी भाषाच वापरली जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या परीक्षेमध्ये चांगले गुण हे भारतात व भारता बाहेरील उच्च शिक्षणासाठी निर्णायक ठरतात.
इंग्रजीमध्ये प्राविणता मिळवण्यासाठी चांगला शब्दसंग्रह असणे आवश्यक आहे. एका रिसर्चनुसार (Masrai et al. 2021, Asian-Pacific Journal of Second and Foreign Language Education), शब्दसंग्रहाच्या ज्ञानाचा प्रभाव मुलांच्या शालेय प्रगतीवर पडतो. त्यामुळे बोलण्याच्या कौशल्याव्यतिरिक्त तुमच्या पाल्याने इंग्रजी भाषेचा चांगला शब्दसंग्रह बनवणे आवश्यक आहे.
या लेखामधून आम्ही तुम्हाला 4 सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याचा इंग्रजीमधील शब्दसंग्रह वाढवू शकाल:
- सतत उजळणी करत राहा (Spaced Repetition ची पद्धत वापरा):
आपण जेवढे समजतो तेवढी आपली स्मरणशक्ती मजबूत नसते. म्हणूनच मुलांनी परीक्षेआधी सर्व काही लक्षात ठेवले तरी परीक्षेमध्ये उत्तरे लिहिताना ते काही गोष्टी विसरण्याची शक्यता असते. हेच एबिंगहॉस याने शास्त्रीय दृष्ट्या ‘फरगेटिंग कर्व्ह’ मधून स्पष्ट केले आहे. या संकल्पनेनुसार आपण जर सतत गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर कालांतराने आपण त्याबद्दल विसरून जातो. दीर्घ काळ गोष्टी लक्षात ठेवण्याकरिता त्याची ठराविक कालांतरानंतर उजळणी करत राहणे आवश्यक आहे. यालाच Spaced Repetition असे म्हणतात.
उदाहरणार्थ तुमचा पाल्य ज्यादिवशी एखादा शब्द शिकेल त्याच्या दुसऱ्या दिवशी, 3 दिवसांनी, 1 आठवडयाने, एक महिन्याने, इ. अशी उजळणी त्याला करत राहायला सांगा.
Source: The original uploader was Icez at English Wikipedia. – Originally from en.wikipedia; description page is/was here., Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=2214107
- नवीन शब्दांना संदर्भ द्या:
मुले शब्दसंग्रहांचा वापर करून नवीन शब्द शिकू शकतात व ते पाठ देखील करू शकतात . परंतु अशा प्रकारे पुनरावृत्ती करून लक्षात ठेवण्याची प्रक्रिया त्यांना फार काळासाठी उपयोगी पडणार नाही, कारण मुले शब्दांचा संदर्भ विसरून जातील. जर त्यांनी नवीन शब्दांचा अभ्यास आपल्या दैनंदिन आयुष्यातील घटनांशी संदर्भ लावून केला तर त्यांचा शब्दसंग्रह अजून मजबूत होईल.
उदाहरणार्थ ‘eloquent’ सारखा एखादा नवीन शब्द शिकल्यावर, त्या शब्दाचा व त्या शब्दाच्या विविध प्रकार यांचा वापर करून त्यांना 3 वाक्य लिहायला सांगा. जसे कि:
- Our teacher gave an eloquent speech on Independence Day.
- In scientific writing, aim for clarity rather than eloquence.
- My mother speaks eloquently about her art.
- तुमच्या मुलांना वाचनाची सवय लावा:
शब्दसंग्रह मजबूत करण्यासाठी नियमित वाचन हा एक उत्तम उपाय आहे. वाचनामुळे मुलांना सतत नवीन शब्दांची संदर्भासहित ओळख होईल. जरी त्यांना एखादा शब्द माहित नसेल तरी त्याची पार्श्वभूमी समजल्यावर त्याची कल्पना त्यांना येईल. मोठ्या मुलांना तुम्ही दररोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावू शकता. जेव्हा पण ते पुस्तक अथवा एखादी बातमी वाचतील तेव्हा त्यांना नवीन शिकलेले 2-3 शब्द एका वहीमध्ये लिहायला सांगा. त्या शब्दांचा अर्थ शोधून काही उदाहरणे लिहायला सांगा. या स्वाध्यायामुळे ते त्यांचा स्वतःचा एक शब्दसंग्रह निर्माण करू शकतील व त्याची वेळोवेळी उजळणी करू शकतील.
- शिकण्यासाठी खेळांचा उपयोग करा:
शब्दसंग्रह वाढवणे हे आपल्यावर ओझे आहे असे मुलांना वाटू देऊ नका. प्रयत्न व सातत्य जरी लागत असले तरी काही खेळांचा वापर करून तुम्ही मुलांसाठी ही प्रक्रिया मजेशीर बनवू शकता.
उदाहरणार्थ स्क्रॅबल हा एक मजेशीर व परस्परसंवादी खेळ आहे जो तुमच्या पाल्याला शब्द लक्षात ठेवायला मदत करेल. शैक्षणिक खेळ जरी थोडे महाग असले तरी ते तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी चांगली गुंतवणूक ठरतील. वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या क्रॉसवर्ड पझलचा उपयोग देखील तुम्ही करू शकता. आजकाल इंग्रजी भाषेसंबंधी मोफत ॲप देखील उपलब्ध असतात. उदाहरणार्थ वर्डस्केप्स (Wordscapes) हा मोफत वर्ड पझल व्हिडिओ गेम आहे ज्यामुळे तुमच्या पाल्याला नवीन शब्द शिकता येतील व त्यांचा सराव करता येईल.
चांगला शब्दसंग्रह निर्माण करणे हा एक मोठा प्रवास आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही त्याची सुरुवात कराल तेवढा उत्तम परिणाम तुम्हाला दिसेल. पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना जास्तीत जास्त नवीन शब्द शिकवा व त्याचा सराव करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. लक्षात ठेवा की प्रत्येक विद्यार्थ्याचा शिकण्याचा एक ठराविक वेग असतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने ते त्यांच्या भाषा शिकण्याच्या प्रवासात नक्कीच चांगली प्रगती करतील.
LEAD चा English Language and General Awareness (ELGA) programme मुलांमध्ये इंग्रजीचे कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो व मल्टि-एज वर्गात एक लेवल बेस्ड दृष्टिकोनाचा उपयोग करतो. पालक व मुले यांच्यासाठी LEAD विविध ठिकाणाहून मुलाखत आयोजित करतो, ज्यामुळे त्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानाचे विश्लेषण करता येते आणि त्यांची किती प्रगती झाली आहे व त्यांना अजून किती शिकायचे आहे हे कळते. LEAD पालकांना जो रिपोर्ट सादर करतो, त्यातील माहितीमुळे पालकांना आपल्या पाल्याच्या क्षमतेबद्दल अधिक चांगल्याप्रकारे समजायला मदत होते.
LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा