मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्यासाठीचे ३ सोपे उपाय
प्रत्येक लहान मुलामध्ये एक वैज्ञानिक दडलेला असतो. मुलांना आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींबद्दल खूप कुतूहल असते. लहान मुलांना आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींना हात लावून, त्या निरखून बघायच्या असतात, त्याचप्रमाणे ती गोष्ट फेकल्यावर त्याचे काय होते हे बघायचे असते आणि त्या गोष्टीची चवपण घेऊन बघायची असते. अशा चंचल व खोडकर पद्धतीने मुले जगातील गोष्टी समजून घेतात. जर आपण बारकाईने विचार केला तर निसर्गाला समजून घेण्याचा दृष्टिकोन पण हाच आहे.
मुलांचे पालक या नात्याने आपल्याला नेहमीच वाटते की मुलांच्या खोडकरपणामुळे त्यांना कोणतीही हानी पोहोचू नये. म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुरक्षित खेळणी देतो. खेळण्यांमध्ये मुलांचे मन रमते व त्यातून ते बऱ्याच गोष्टी देखील शिकतात. परंतु याच खेळण्यांमूळे व शाळेत पाठ्यपुस्तकांवर खूप भर दिल्याने मुलांचे निसर्गाबद्दलचे कुतूहल हळूहळू कमी होत जाते. अशाप्रकारे निसर्गापासून दुरावणे हे मुलांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल भीती निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे. ही समस्या भविष्यात आपल्या मुलांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून बाधक ठरू शकते या काळजीने पालक या समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध मार्ग शोधू लागतात.
मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड कोणत्याही वयात निर्माण करता येऊ शकते. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.
‘का’ आणि ‘कसे’ हे विचारायला मुलांना प्रोत्साहित करा:
(फोटो: पेंट ब्रश चे धागे पाण्यात एकमेकांना चिकटतात)
मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल एक जिज्ञासा असते. ते आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बघतात, त्याचा अभ्यास करतात आणि त्यांना समजून घेतात. मुलांच्या मोठ्या होण्याच्या प्रवासात त्यांच्यातल्या या कुतूहलाला कमी होऊ देऊ नका.
कदाचित त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतील. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे प्रश्न अनुत्तरित न ठेवता त्यांना प्रश्नांची उत्तरे शोधायला मदत करा. इंटरनेटमुळे ही उत्तरे शोधणे खूप सोपे झाले आहे. मुले इंटरनेट ब्राउजिंग तुमच्या देखरेखीखाली करतील याची काळजी घ्या. त्यामुळे ते सुरक्षित वेबसाईट ओळखू शकतील. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्ये अनेक वैज्ञानिक सिद्धांत दडलेले आहेत, त्यांना सोप्या भाषेमध्ये समजावणारे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ आपल्याला विद्युत आवेश म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटीक चार्ज ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर त्यांना एक छोटे प्रात्यक्षिक दाखवा. एक कंगवा घ्या, त्याने आपले केस विंचरा व त्यानंतर त्या कंगव्याला कागदाच्या छोट्या तुकड्यांजवळ न्या. आपल्याला ते कागदाचे छोटे तुकडे कंगव्याला चिकटलेले दिसतील. या सोप्या प्रात्यक्षिकामुळे तुम्ही तुमच्या मुलांना समजावू शकाल की घर्षणामुळे विद्युत आवेश कसा तयार होतो. जर तुम्ही असे छोटे-छोटे प्रयोग घरी करू शकत नसाल तर तुम्ही त्यांना इंटरनेटवर उपलब्ध असलेले असे व्हिडिओ दाखवू शकता.
विज्ञानाची स्पर्धा किंवा प्रदर्शन यांची वाट न बघता तुम्ही तुमच्या मुलांना विज्ञानाचे प्रकल्प बनविण्यास प्रोत्साहन द्या. शक्यतो प्रयत्न करा की हे प्रकल्प आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असतील. जसे की पाण्यामध्ये चित्रकलेचा ब्रश बुडवल्यावर ब्रशचे धागे एकमेकांना का चिकटतात? यावरून मुलांना कळेल की पृष्ठभागावरील ताण (सर्फेस टेन्शन) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
सकाळी चालायला जाल तेव्हा मुलांशी वैज्ञानिक गोष्टींवर बोला:
कोरोनामुळे आपले घराबाहेर पडणे खूप कमी झाले आहे. परंतु सकाळी चालायला जाणे हे विज्ञानाशी जोडून घेण्याचा चांगला मार्ग बनू शकतो. आपल्या आजूबाजूला निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावरून आपण आपल्या मुलांना विज्ञानाचे मुलभूत सिद्धांत शिकवू शकतो. जसे की सकाळी आभाळ भरून आले असेल तर तुम्ही मुलांना पाण्यापासून वाफ आणि वाफेपासून ढग कसे बनतात याची प्रक्रिया समजावू शकता. अशा छोट्या-छोट्या संभाषणामुळे मुलांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड अजून वाढेल आणि ते शाळेतील पुस्तकात वाचलेल्या गोष्टी निसर्गाशी जोडू शकतील.
विज्ञानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा:
आई वडिलांचे जसे विचार असतात तसेच ते मुलांचे देखील होतात. जर मुलांनी तुमच्याकडून अथवा कुटुंबातील इतर कोणाकडून ऐकले की विज्ञान अवघड आहे तर त्यांना देखील ते अवघडच वाटायला लागेल. म्हणूनच तुम्ही नेहमी सजग रहा आणि मुलांसमोर नेहमी सकारात्मक बोला. तुम्ही व्यवसायाने विज्ञानाशी जरी निगडित नसाल तरीसुद्धा, प्रयत्न करा की तुमच्या मनामध्ये विज्ञानाविषयी दुराग्रह नसेल. विज्ञानामध्ये फक्त हुशार मुलेच पुढे जाऊ शकतात असे मुलांसमोर बोलू नका. विज्ञानाचा अभ्यास केल्याने आपली तार्किक क्षमता वाढते. जो कोणी थोडी मेहनत करायला तयार असेल तो विज्ञान योग्य पद्धतीने समजू शकतो.
विज्ञानाची आवड निर्माण करणे व ती टिकवून ठेवणे, हे पालक व शिक्षक दोघांसाठी एक आव्हान आहे. मुलांच्या मनात विज्ञानाविषयीचा दुराग्रह अजिबात असला नाही तर ते शाळेत चांगल्या गुणांनी पास होतीलच आणि ते विज्ञानाविषयीच्या क्षेत्रामध्ये करिअर सुद्धा घडवू शकतील.
लक्षात ठेवा विज्ञानाबद्दलची आवड कोणत्याही वयात निर्माण करता येऊ शकते. मात्र विज्ञानाची आवड लहान वयात मुलांमध्ये निर्माण झाली तर समाजात विज्ञानाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल.
वर्तमानकाळात कोरोना महामारी मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठे आव्हान बनून समोर आली आहे आणि याचा सामना करण्यासाठी LEAD तुमच्या मदतीकरिता पुढे आले आहे. LEAD ने शाळेतील पाठ्यक्रमाला समजणे सोपे केले आहे. आईवडीलसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात. LEAD Student App च्या मदतीने विद्यार्थी हे प्रत्येक दिवशी लाईव्ह वर्गात भाग घेऊ शकतात, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात व ताबडतोब आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.
डिजिटल लर्निंग कंटेन्ट, फिजिकल रीडर आणि वर्कबुक, लर्निंग अॅक्टिव्हिटी, ई-बुक्स, नियमित मूल्यांकन, पर्सनलाइज्ड रिव्हिजन, गृह अभ्यास, शंकांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रीय प्रतियोगिता ही LEAD ची इतर अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत.
LEAD मुलांना एका उज्ज्वल भविष्यासाठी तयार करते. LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा