कल्पकता मुलांच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग असण्याची ३ कारणे
केम्ब्रिज इंग्रजी शब्दकोशानुसार कल्पकतेची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे: असामान्य कल्पना निर्माण करण्याची अथवा मूळ कल्पना वापरण्याची क्षमता. जर तुम्ही यशस्वी लोकांचे निरीक्षण कराल तर तुम्हाला ते सामान्य लोकांपेक्षा थोडे वेगळे वाटतील. बऱ्याच जणांना ते ‘वेगळे’ आहेत असे वाटते, पण ते ‘वेगळे’ नसून ‘कल्पक’ (creative) असतात. मग ते कोणत्याही क्षेत्रात असू देत: कला, विज्ञान अथवा व्यवसाय. आजच्या जगात कल्पक दृष्टिकोन असण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच कदाचित स्टिव्ह जॉब व इलॉन मस्क सारखे लोक खूप जणांचे आदर्श आहेत.
बऱ्याच जणांचा असा दृष्टिकोन असतो की कल्पकता ही एक जन्मजात वृत्ती असते. हे काही जणांच्या बाबतीत जरी खरे असले तरी कल्पकता ही फक्त याच लोकांपुरती सीमित नसते. योग्य प्रकारे व वेळेत मार्गदर्शन केल्याने पालक हळूहळू ही क्षमता मुलांमध्ये विकसित करू शकतात.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मुलांची कल्पकता वाढवण्यात लक्ष घालण्याची ३ कारणे सांगणार आहोत:
1. त्यांचा प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन विकसित होईल :
कल्पकतेमुळे आपण कोणत्याही अडचणींकडे मोकळ्या मनाने पाहू शकतो व नाविन्यपूर्ण उपायांचा विचार करू शकतो. मुले सोप्या कल्पकतापूर्ण उपक्रमांमधून हा दृष्टिकोन आत्मसात करू शकतील व आयुष्यातील इतर गोष्टीत पण त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल.
उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मुलांना चित्रकला शिकायला प्रोत्साहित करू शकता. त्यामध्ये मानवी आकृती काढायला शिकताना तुमचे पाल्य हे पण शिकेल की मानवी क्लिष्ट आकारायला सोप्या भौमितिक आकारामध्ये कसे रूपांतरित करायचे. अवघड गोष्टींना सोप्या व सोडवता येतील अशा गोष्टींमध्ये रूपांतरित करण्याचा दृष्टिकोन मुलांना IIT व IIM अशा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना देखील उपयोगी होईल. या उच्च-शिक्षणाच्या संस्था विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीच्या वैचारिक क्षमतेची अपेक्षा करण्याचे कारण म्हणजे त्यांना प्रतिभा असणारा समूह निर्माण करायचा असतो जो जगासमोर येणाऱ्या कठीण समस्यांचे निराकरण करू शकेल. लहानपणी केलेल्या कल्पकतापूर्ण कृती त्यांच्या उज्वल करियर चा पाया ठरतील.
2. मुलांच्या मानसिक स्वास्थ्याला चालना मिळेल :
कल्पकते बरोबर अनेक चढ-उतार आणि अपयशाचा धोका पण येतो. जेव्हा कोणताही कलाकार एखादी मूर्ती बनवायला सुरुवात करतो तेव्हा एक शक्यता अशी असते की त्याने जसा विचार केला तशी मूर्ती बनत नाही. असे असले तरी मूर्तिकार सतत मूर्ती बनवत राहतो व हळूहळू आपल्या कौशल्यात सुधारणा करतो.
असे प्रत्येक शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये होऊ शकते. जेव्हा कोणताही विद्यार्थी स्वतः काही बनवायला सुरुवात करतो, ते कितीही साधे व सोपे असले तरी, तेव्हा त्याला स्वतःच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना समजते की काहीपण मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो व सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशाप्रकारे ते अंतिम निकालाची काळजी न करता प्रक्रियेचा आनंद घेतात. मोठे झाल्यावर हा दृष्टिकोन त्यांना स्पर्धा परीक्षा, तणावपूर्ण वाटणाऱ्या महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षा, नोकरीसाठी असणारी मुलाखत या ठिकाणी उपयोगी ठरतो.
कल्पकता हे नकारात्मक भावना जसे की राग, अस्वस्थपणा हे दूर ठेवण्यासाठीचे उत्तम मार्ग आहे.
उदाहरणार्थ लॉकडाऊनच्या काळात तुमच्या मुलाला अस्थिर वाटत असेल तर तुम्ही त्याला टी. व्ही बघायला न सांगता कल्पक छंद जोपासायला सांगा. जर मुलांना बॉलीवूडचे चित्रपट आवडत असतील तर त्यांना त्यातील नृत्याची पद्धत शिकायला प्रोत्साहन द्या. तुम्हाला त्यांना नृत्याच्या शिकवणीला पाठवायची गरज नाही. आजकाल युट्युबवर अनेक मोफत व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातून ते सोप्या नृत्यांच्या स्टेप्स शिकू शकतील. उदाहरणार्थ तुम्ही G.M डान्स सेंटरचा हा व्हिडिओ पाहू शकता. तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही त्यांचा डान्सचा (नृत्याचा) व्हिडिओ देखील बनवू शकता.
3. त्यांना करियरचा वेगळा मार्ग निवडायला मदत होईल :
पूर्वी लोक आर्थिक सुरक्षेसाठी पारंपारिक करियर चा मार्ग निवडायचे. परंतु आजची युवा पिढी असा करियर चा मार्ग निवडते ज्यात त्यांना काम केल्याचे समाधान मिळते. पारंपरिक ‘डेस्क जॉब’ मध्ये ते समाधान मिल्ने अवघड असते. तुमच्या मुलांच्या कल्पकतेला चालना दिल्याने ते भविष्यात त्यांना आवडणारे करियर निवडू शकतील.
कला, संगीत व खेळ अशा कल्पकता असलेल्या क्षेत्रात जितक्या लहान वयात सुरुवात करून द्याल तेवढा मुलांना त्याचा फायदा होईल. मुलांमध्ये कलेची किती आवड आहे, त्यांना काय वाटते, त्यांच्याशी चर्चा करा, व त्यांची प्रतिक्रिया बघा.
उदाहरणार्थ जर तुमचा पाल्य कार्टून बघताना आनंदी होत असेल तर त्याला चित्र काढायला प्रोत्साहन द्या. जर त्याला ही प्रक्रिया आवडली तर त्याला ‘आर्ट ऑफ कॉमिक्स’ शिकायला मदत करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पाल्याला विविध कल्पक मार्ग जसे की मीडिया व ऍनिमेशन बद्दल अधिक आवड माहित प्राप्त करायला मदत करू शकता.
गणित व शास्त्र या बरोबरच कल्पकता हा पण शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे. परंतु दुर्दैवाने आजही बहुतांश मुलांना फाईन आर्ट, संगीत, नृत्य व इतर अशा गोष्टीतील ज्ञान खूप कमी मिळते. तुमच्या पाल्याला उत्तम शिक्षण देताना फक्त पारंपरिक दृष्टिकोन ठेवू नका. त्यांना त्यांचे कौशल्य शोधण्यासाठी संधी द्या. ते कदाचित त्यांच्यासाठी एक अनमोल भेटवस्तू ठरेल.
तुम्ही तुमच्या पाल्याला अशा प्रकारचा वर्ल्ड क्लास एज्युकेशनचा अनुभव देऊ इच्छिता का? तर मग तुमच्या जवळची LEAD संचालित शाळा आजच शोधा. हा फॉर्म भरा