मुलांना अपूर्णांक शिकवण्याचे 3 सोपे उपाय
अनेक पालक हे मान्य करतील की त्यांच्या मुलांना अपूर्णांक समजून घ्यायला अवघड जाते. जरी मुलांना अपूर्णांकांच्या संकल्पनेचा परिचय इयत्ता 4थीत करून दिला जातो तरी बऱ्याच मुलांना उच्च माध्यमिक वर्गात गेल्यावर देखील अपूर्णांकांचा वापर करणे अवघड जाते. ते बेरीज, वजाबाकी किंवा भागाकार यासारख्या क्रिया करताना अडखळतात. त्यामुळे मुले गणित सोडवण्याचे विविध शॉर्टकट लक्षात ठेवायला सुरवात करतात. परंतु अशा पद्धतीने केलेला अभ्यास त्यांना फार काळापर्यंत उपयुक्त ठरत नाही. जोपर्यंत मुलांना अपूर्णांकांची संकल्पना व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत ते छोट्या-छोट्या चुका करत राहतील.
विद्यार्थी मोठे झाले तरी त्यांना अपूर्णांकाचा वापर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या दैनंदिन जीवनात करायलाच लागतो. उदाहरणार्थ कॉलेजच्या शिक्षणात किंवा नोकरी शोधताना अभियोग्यता चाचणी देण्याकरिता अपूर्णांक असलेले गणित अचूकतेने व वेगाने सोडविण्याकरिता अपूर्णांकांचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला 3 सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याची अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट करू शकता.
मुलांची कल्पनाशक्ती वाढवायला मदत करा:
(Description: अपूर्णांक दर्शवण्यासाठी काढलेल्या चित्राचा नमुना)
बऱ्याच मुलांना अपूर्णांक अवघड वाटतात कारण ते त्याचे भौतिक महत्व समजू शकत नाहीत. ½ आणि ⅔ यांच्या बेरजेचा भौतिक अर्थ जोपर्यंत मुले समजू शकत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्याचे नियम समजणे अवघड जाईल. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीने त्यांना ½ व ⅔ बेरीज करण्याचे फक्त नियम शिकवण्यापेक्षा त्यांना दैनंदिन जीवनातील वस्तूंचा उपयोग करून त्यामागील संकल्पना समजावून सांगा.
उदाहरणार्थ तुम्ही चार्ट पेपर व स्केचपेनचा उपयोग करून खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे आयताकृती पट्ट्या बनवू शकता. या पट्ट्यांवर दोन अपूर्णांक दाखवण्यासाठी विभाजन दाखवा. यामुळे त्यांना अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट होईल व त्याची बेरीज काय दर्शवते हे समजेल. अपूर्णांक दर्शवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या घरगुती गोष्टी जसे की ब्रेडचे स्लाईस अथवा पोळीचा वापर देखील करू शकता.
इंटरनेटवर अनेक सिम्युलेटर सुद्धा उपलब्ध आहेत ज्यामुळे तुमच्या पाल्याला दृश्य स्वरूपात अपूर्णांक समजायला मदत होईल.
उदाहणार्थ Math Playground’s Fraction bars हा एक सोपा सिम्युलेटर आहे ज्याने तुमच्या पाल्याला अपूर्णांकाची कल्पना करायला मदत होईल. विद्यार्थ्याने स्लाईडर फिरवल्यावर त्याला दिसेल की अंश व छेद यामध्ये बदल केल्याने कशाप्रकारे अपूर्णांकाची संख्या वाढते अथवा कमी होते.
सोपे व स्वतः बनवता येतील असे DIY (डू इट यूरसेल्फ) खेळ बनवा:
शिकण्याची प्रक्रिया परस्परसंवादी व सोपी करण्याकरिता काही खेळ तुम्ही स्वतः घरी बनवू शकता.
उदाहरणार्थ तुम्ही अपूर्णांक फिरकीपटू (फ्रेक्शन स्पिनर) हा खेळ बनवू शकता. एका कोऱ्या कागदावर पाय-चार्ट बनवा. त्याचे सम भाग करा, शक्यतो 16 भाग करा. आता खाली दिलेल्या चित्राप्रमाणे प्रत्येक पाय मध्ये एक अपूर्णांक संख्या लिहा. आता पेपरक्लिप व पेन्सिल घ्या. पेपरक्लिप कागदाच्या मध्यात धरून ठेवा. आता पेन्सिलचा सपाट भाग कागदावर ठेवा. त्यानंतर अंगठा व तर्जनीच्या मदतीने पेपरक्लिप फिरवा. त्यामुळे पेपरक्लिप पेन्सिलच्या भोवती फिरेल. पेपरक्लिप फिरून झाल्यावर ती एका पाय मध्ये थांबेल जिथे ठराविक अपूर्णांक लिहिलेला असेल. एखाद्या ठराविक अपूर्णांकावर पेपरक्लिप थांबली की तुमच्या पाल्याने कोणती कृती करायची याची यादी तुम्ही करू शकता.
काही उदाहरणे खालीलप्रमाणे:
i. जर अपूर्णांक संपूर्ण संख्येत रूपांतरित होत असेल तर उठून उभे राहणे
ii. अपूर्णांकाची संख्या 1 पेक्षा जास्त असेल तर टाळ्या वाजवणे
iii. शक्य असल्यास अपूर्णांक कमी करणे
वर्कशीटचे सेट बनवा:
(Description: वर्कशीटचा एक नमुना)
मुलांना अपूर्णांक अगदी सहजपणे सोडवायचे असतील तर नियमित सराव खूप महत्वाचा आहे. नियमितपणे वर्कशीट सोडवल्यास ते अपूर्णांक अचूक पद्धतीने व वेगाने सोडवू शकतील.
उदाहरणार्थ तुम्ही त्यांच्या पाठ्यपुस्तकावर आधारित काही वर्कशीट बनवू शकता किंवा ऑनलाईन काही वर्कशीटचे नमुने शोधू शकता. अशा वर्कशीटद्वारे तुमच्या पाल्याला गणितातील विविध प्रकारच्या क्रियांचा सराव करायला मदत होईल. जसे की अपूर्णांकाला साध्या स्वरूपात रूपांतरित करणे, अपूर्णांकाची दशांश संख्या शोधणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार करणे, इत्यादी.
आम्ही आशा करतो की या लेखामध्ये दिलेले उपाय वापरून अपूर्णांक शिकणे तुमच्या मुलांसाठी सोपे होईल व ते अपूर्णांकाशी निगडित प्रश्न हसत-खेळत सोडवू शकतील. मुलांना कोणत्याही विषयात निष्णात बनवायची घाई करू नका. त्यांना एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी जेवढा वेळ लागत असेल तेवढा घेऊ द्या. अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करायला त्यांची मदत करू शकता.
वर्तमानकाळात कोरोना महामारी मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठे आव्हान बनून समोर आली आहे आणि याचा सामना करण्यासाठी LEAD तुमच्या मदतीकरिता पुढे आले आहे. LEAD ने शाळेतील पाठ्यक्रमाला समजणे सोपे केले आहे. आईवडीलसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात. LEAD Student App च्या मदतीने विद्यार्थी हे प्रत्येक दिवशी लाईव्ह वर्गात भाग घेऊ शकतात, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात व ताबडतोब आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.
डिजिटल लर्निंग कंटेन्ट, फिजिकल रीडर आणि वर्कबुक, लर्निंग अॅक्टिव्हिटी, ई-बुक्स, नियमित मूल्यांकन, पर्सनलाइज्ड रिव्हिजन, गृह अभ्यास, शंकांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रीय प्रतियोगिता ही LEAD ची इतर अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत.
LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा